हे पुस्तक दलित अस्तित्वाची मांडणी करणारा एक दस्तऐवज आहे. दलित आणि दलितेतरांच्या उच्चभ्रू वर्तुळांकडेही भिंग लावून पाहण्याचं काम हे पुस्तक करतं...

आजच्या जातीय-भांडवली भारतात दलित म्हणून जगणं याचा नेमका अर्थ काय? भय आणि दडपशाहीशिवाय मोकळेपणाने विचार करण्यासाठी, जगण्यासाठी एखाद्या समूहाला जेव्हा कुठलाच अवकाश दिला जात नाही, तेव्हा त्या समूहाला आपण कसं समजून घ्यायचं? दलित ‘असणं’ हे आत्ता ‘असणं’ आहे. हे पुस्तक पहिल्या पिढीतील सुशिक्षित दलितांचा दृष्टिकोन मांडतं आणि विविध विचारसरणींचा प्रभाव असलेल्या बदलत्या जगाचा अनुभव हा दलित कसा घेतो, हे सांगतं.......